कुठे 'मी' हरवलाे....
--------------------
कुठे 'मी' हरवलाे.
मलाचं मी शाेधीत बसलाे.
ढासाळलेल्या मनाला,
मीचं माझा सांत्वन घालीत बसलाे.
सारेचं शब्द माझे मुके झाले.
त्यांना 'मी' आेंठावर आणण्यात,
कमजाेर झालाे.
एकटा-एकटाच आता 'मी'जगताे.
त्या एकटेपणातही तुलाचं 'मी' शाेधीताे.
साऱ्या वाटा आज सुन्या-सुन्या झाल्यात.
त्या वाटेत तुझ्या येण्याच्या,
चाहुलही मला भासतात.
राहुन-राहुन सारं काही आठवतं जाताे.
तुला वीसरण्याच्या प्रयत्नात मी,
सतत का, हारत जाताे....
का,तुझी-माझी भेट घडली.
वीरहाने ती मला आता सारीचं अशी छळली. त्या साऱ्या आठवणी मी लपवताेय.
पण डाेळ्यांत त्या साऱ्या इतरांना कळुन येतात.
हा तुझा जीवघेना भास अनं आठवणी,
मला आता नकाे वाटतात.
डाेळ्यांत आसवांनी सारख्या दाटतात.....
जीव तुझ्यात गुंतवुण,
साराचं आज हारुन गेलाे.
हाती फक्त कागद घेऊन,
आठवणी त्याचं लीहु लागलाे.....
आठवणी त्याचं लीहु लागलाे.....
- ज्ञानेश्वर अशाेक थाेरात.
(९०७५८३८३५४)
(ता.- मुरबाड, जि.-ठाणे.)
https://kavyasakhadnyaneshwarthorat.blogspot.com