"मी विरून गेलो"
चिंब भिजून मन, मी अंतर्मुख होऊनी गेलो,,
मम हृदयाची स्पंदने, मी चुकवीत गेलो..
गहिवरले नयन, मी जलमय जाहलो,,
हुंदक्यांना विस्फारून,
मी बालस जाहलो..
तुझ संग राहीन, मी असा न उरलो,,
नयन भर तुज पाहीन,
मी दृष्टीहिन जाहलो..
सृष्टित सखे तुजविण, मी रंक होऊनी गेलो,,
विरहात सजनी, श्रावणात मी विरून गेलो...
- आदेश वंदना हरी जाधव
9673376685
7506849470
खूप सुंदर शब्द रचना " विरून " विरून जाता येतो पण विरलेल्या आठवणी राहतात हृदयात...!