**********Updated**********
उठली उठली चिमणी पाखरं उठली
पेटली पेटली वनराई पेटली
उन्हात ग्रीष्माच्या अवकळा भेटली
नाचली नाचली ठिणगी वनराई पेटली
पाला पाचोळा पाचोळा आगीनं घेतला कुशीत
पेटलं पेटलं रान रान धगधगंत
पळाली पळाली चिमणी पाखरं पळाली
आग डोंबात ढसा ढसा रोपटी रडाली
पेटला पेटला वणवा चौकड पेटला
राख राख झालं एक एक लाकुड
पाहता पाहता वणवा पसरला
झाडा झुडूपातुन घाटीवर चढला
वाढल्या वाढल्या झळा गरम वाढल्या
वाळल्या वाळल्या तृणाशी भिडल्या
दाटला दाटला धुर नभात दाटला
उडाली उडाली चिमणी पाखरं उडाली..!!
**********Updated**********