तुझ्या वीणा मन उदास राहतं
तुझ्या वीणा जग सुन्न वाटतं
तुला माझी आठवण येईल
तरी मी तुला दिसणार नाही
जेव्हा चाहूल लागेल तुला
मी तिथे दिसणार नाही
मृगजळा परी प्रीत माझी
तुला मिळणार नाही
खूप रडलोय मी तुला
आठवून आता तू एकदा
तरी माझी आठवण काढून
रडशील तेव्हा पण मी येणार नाही
जेव्हा तुझ्यासाठी सुख
धावून येईल तेव्हा हा वारा पण
तुला सोबत देईल पण
तुझ्या या सुखाच्या पावसात
मी तुला कधीच दिसणार नाही
जेव्हा तुला माझी आठवण येईल
तेव्हा पुन्हा त्या वाटेवर तू जाशील
जिथं मी तुला भेटलो होतो
पण जेंव्हा तू मला शोधण्यासाठी
जाशील त्या वाटेवरच्या त्या
प्रेम खुणा सुद्धा मिटल्या असतील
मी तुला तिथं मिळणार नाही
पण एकदा तू प्रेमानं हाक
देशील साथ मी तिथं देईल
पण जेव्हा तू मला स्मरशील
तेव्हा मी तुला मिळणार नाही
✍🏻(कवी.अमोलभाऊ शिंदे पाटील).
मो.96370409000.अहमदनगर