आयुष्याच्या वर्तुळात
सुखाच्या त्रिज्येने आनंदाचा व्यास काढावा
कर्मरूपी पाया टाकून
हळूहळू मोक्ष साधावा ॥
व्यर्थ उगा दुःखाचे परीघ पाहून
का विवंचनेस क्षेत्रफळात मिसळावे ?
परमार्थी खरा अर्थ जाण मानवा
मरणास मध्यबिंदू मानुनी जगावे ॥
हर एक कसोटीत खरे उतरावे
परिघांना उचलून दूर फेकून द्यावे
कर्मास सुखाच्या वर्गाने गुणावे
पुण्याचे क्षेत्रफ़ळ वाढवत न्यावे
वाढवत न्यावे , अंतिमतः भगवंती सुखे लीन व्हावे ॥
सिद्धेश्वर विलास पाटणकर C