पिकनिक
चिऊ काऊ मोती माऊ
सगळ्यांना बरोबर घेऊ
चॉकलेटच्या बागेत जाऊ
असेल तिथे भरपूर खाऊ
चॉकलेटची फळे, चॉकलेटचे तळे
कँडीची फुले, बर्फाचे गोळे
आभाळाला टांगले नूडल्सचे झुले
बर्फाची घसरगुंडी, गुलाबी थंडी
खेळून थकले, भिजले चिंब
खाऊन पिऊन फुगले टम्म
चालता येईना, झाले ढिम्म
रात्र झाली, नका भिऊ
आता आपण घरी जाऊ
उद्या पुन्हा परत येऊ
ओले लागून बाळ रडले
पहाट होता स्वप्न मोडले
- अरूण सु.पाटील
https://www.facebook.com/AsuChyaKavita