२८/०१/२०१७
मिलन
रात सारी डोळ्यात जागी
ये तू जवळी जरा कुशीत जरा
दूर का तू आज अशी
सोड पहारा सारा लज्जेचा
रात मिलनाची आज अशी
बघ ना अधीरही आसमंत सारा
कमलदले ओठांचीही लाली
एकवार चुंबू दे मला
नजर शराबी गाल गुलाबी
बघ रातराणीही अधीर मिलनाला
ती लाजली प्रियतमा तू का बावरली
तू रती, मी मदन होऊ दे मला
बाहुपाशात संपली कशी रात सारी
निमिष तुला ना मला कोणाचा
हात हातावरी ओठ ओठांवरी
श्वास श्वासात गुंतला भान तुला ना मला
सोड आता केस मोकळे पाठीवरी
बघ उगवला रवी पिरतीचा
मी तुझा अन तू माझी
संसार आपला साताजन्माचा
© महेंद्र विठ्ठलराव गांगर्डे पाटील
9422909143