पाऊस दाटला
पाऊस दाटला मनात, राना वनात
आसमंत काळोखला
झाली धरती आतूर
पावसाचा थेंब झाला
वैरी वाऱ्याला फितूर
पाऊस दाटला मनात, राना वनात
वीज नाचते नभी
ढग वाजविती ढोल
वनी श्वापदे उभी
गेला माणसाचा तोल
पाऊस दाटला मनात, राना वनात
सुटे थंडगार वारा
अंगी भीतीचा शहारा
घुमे झाडात आसरा
नाही पावसाच्या धारा
पाऊस दाटला मनात, राना वनात
नाही पावसाचा थेंब
कसा जगावा कोंब
वर्षा आगीची बरसून
जीव गेला करपून
पाऊस दाटला मनात, राना वनात
उर फुटून जेव्हा
डोळ्यातून आले पाणी
आला पाऊस म्हणून
गावी पावसाची गाणी
पाऊस दाटला मनात, राना वनात
- अरूण सु.पाटील
https://www.facebook.com/AsuChyaKavita
I like