प्रेम जग ते वेगळेच असते
जिथे फक्त प्रेम आणि प्रेमच असते
जेंव्हा प्रेमी सोबत असतात
तेव्हांही प्रेमी जेंव्हा लांब असतात
जग ते सगळे प्रेमीयांचे असते...
एकमेकांच्या विचारात रमणे
एकमेकांसाठी राञभर जागणे
सारखे चेहरा एकमेकांचा निहाळणे
रंगीबेरंगी घालून कपडे नटणे
जगावेगळ्या अनुभवांचे असते
हाकेच्या अंतरावर असतात दोघे
दोघाचीही असते मुक्याची भूमिका
व्यापक असते व्याप्ती प्रेमाची
भिती तव नसते प्रेमीयांना जगाची
जग ते सगळे दोघांचेच असते....