मला माझे स्वपन जपावे वाटते
पण काय करू जग हे माझेच वाटते
मला रोखावे पाऊल स्वतःचे वाटते
रोखून पुन्हा दुनियेशी भेटावे वाटते
मला माझे स्वपन जपावे वाटते
इतरांच्यात ही मला आपलेपण वाटते
वाटेवरती जगीच्या थोडे थांबावे वाटते
माझ्याचकरिता पुन्हा पुढे चालावे वाटते
मला माझे स्वपन जपावे वाटते
माझ्यातच वसलेल्या जगताशी भेटावे वाटते