.... आठवण.....
रुसव्यात शोध तिला
त्या एकांतात शोध तिला
दुखाच्या स्मरणात
आठवणीच्या वादळात शोध तिला
आठवण अविस्मरणीय आहे
क्षण गेले आहेत
पण सर्वत्र चाहुल तिची आहे
सुखाचे क्षण थांबत नाही
काळजात कुणी मुक्काम करून जातो
काही अविस्मरणीय आठवण देऊन जातो
का कळेना वेळो वेळी एकांत देऊन जातो
आयुष्यातील ही नीति बदलता येत नाही
आपण जगावे तसे जगावे
मात्र भूतकाळ आपल्याला सोडत नाही
कुठेतरी निरंतर मनात दाटलेले ते क्षण असतात
एकांतात कधीतरी ते आठवतात
भास् होतो थोडा त्रास होतो
आठवणी ताज्या झाल्या की मनातला धड धड श्वास होतो
या आयुष्यात गमावलं काही
काही कमावलं असेल
निघून गेलेल्या व्यक्तींच्या आठवणी राहून जातात
ती व्यक्ति राहात नाही
आणि आठवणीशिवाय आपल्याकडे दूसरा पर्याय राहत नाही...
सुमेध थूल
Nice
thanks sneha