Marathi Kavita : मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita => Other Poems | इतर कविता => Topic started by: कदम on September 09, 2017, 11:30:25 AM

Title: ओढ
Post by: कदम on September 09, 2017, 11:30:25 AM

राञीला ओढ असते
दिवस रूपाने परतण्याची
सुर्य किरणांना ओढ असते
प्रकाश होवून धरतीवरती थडकण्याची

कोवळ्या किरणांना ओढ असते
धगधगत मावळतीकडे निघण्याची
सूर्योदयाला जणू ओढ असते
सहनशक्ती पुढे धरतीच्या नमण्याची