आला आला आला
पावसाळा आला
भर भर आला
गार गार वारा
दिनभर देहा
शहारून गेला
भर भर आले
काळे काळे ढग
वीज कडाक्याने
गडाडून गेली
खळ खळ पाणी
पळे भरा भर
चारी चारीतून
ओढ्याला भेटण्या
भर भर ओढा
भरून वाहतो
पटापटा तळे
पाण्याने भरतो
भर भर कैक
बेडके जमली
डराव डराव
मैफल रंगली
भर भर झाडे
ओली ओली झाली
न्हाऊन पाण्याने
मोहरून गेली
आला आला आला
पावसाळा आला