नभ आटलं,
काळीज फाटलं
खुडलं सपानं,
नयनी दाटलं ॥
तान्ह्या लेकराची,
माय उपाशी
काटें बोचती पाया,
गाठ दुखाशी
हंबरत्या वासरानं
शिवार गाठलं
खुडलं सपानं,
नयनी दाटलं ॥
नशिबात आलं
दुष्काळी ईघनं
पावसानं सोडलं
आमच्याकडं बघणं
सुखाच्या रस्त्यामंधी
दुःखानं गाठलं
खुडलं सपानं,
नयनी दाटलं ॥
संजय लिंबाजी बनसोडे
sanjaylbansode.blogspot.com