🦆⛈ #पावसातली_पाखरं ⛈🦆
निर्भीडपणे वावरणारी,
जणू या जगाची ठाकरं..
खिडकीत मला दिसलेली,
ती पावसातली पाखरं..!!
पावसात चिंब भिजणारी,
पंखाने ती धडपडणारी..
मधुर कल्लोळ करणारी,
ती पावसातली पाखरं..!!
थोडीशी ती शहारलेली,
खिडकीमध्ये बहरलेली..
आडोशाला बिथरलेली,
ती पावसातली पाखरं..!!
जाण्यासाठी आवरलेली,
दाण्याण्यासाठी सावरलेली..
पिल्लांस भेटण्या आतुरलेली,
ती पावसातली पाखरं..!!
अचानक पाऊस थांबला,
मग यांची उडण्याची नखरं...
नुकतीच खिडकीत मी पाहिली,
ती पावसातली पाखरं...!!!
-
👼 #प्रेमवेडा_राजकुमार 👼
( #धनराज_होवाळ )
कुंडल, जि. सांगली
मो. ९९७०६७९९४९.
🙏🏻💐🐥👼🐥💐🙏🏻
Chhaan
Very Nice....Poem.