तूच दिला थारा
तूच दिला चारा
सोसाट्याचा मारा
परि तुझाच सहारा ॥
जातिवाद दाट
होता लई बाट
अंधाराची वाट
परि मुखी तुझा नारा ॥
तुझच हे देणं
तुझच हे लेणं
तुझं गुणगानं
गातो जग आज सारा ॥
लेखणीला वाच्या
आली संजयाच्या
जयभीम नामाच्या
संग वाहे,समतेचा वारा ॥
sanjay limbaji bansode
खूप सुंदर लिखाण केले सर, अप्रतिम