'आशेची किरण'
उंच उंच भरारी
पंखास या बळ नवे,
स्वरात या दाही दिशा
वाऱ्यासंगे झुमू सारे.
शौर्य आम्ही,धैर्य साथी
साहसी ही वृत्ती आमुची
अबला नाही,सबला होऊ
काळजात स्नेह पेरू .
दृश्य ते स्वप्नातले
क्षितीजापरी पाहू,
अमृतरूपी अश्रुंना
सतत जपत राहु.
आज कोण, उदया काही
शब्दात बोध राही,
अनंत या जगामध्ये
अंश ही आमुचा राही.
आता वाट धरू
काळोख्याची
शितलता जपू चंद्रमाची
त्या लखलखत्या
सुर्याला ही म्हणू, देगा आम्हा
एक किरण आशेची....