*गजल. क्र.५*
*वृत्त.मंजूघोषा*
*लगावली*
*गालगागा गालगागा गालगागा*
जीवनाची काहिली मी पाहिल्यावर
पापणी ती झाकली मी पाहिल्यावर
झोक गेला शांत झाला लाजल्यावर
मान कागं झूकली मी पाहिल्यावर
नाद होता प्रेम केले भेटल्यावर
भेट होती मोडली मी पाहिल्यावर
हात माझा सोडला तू हारल्यावर
मूठ होती झाकली मी पाहिल्यावर
छाटले ते हात माझे जिंकल्यावर
आण होती तोडली मी पाहिल्यावर
दैव सारे जाळले गं सोडल्यावर
नाव सारे खोडली मी पाहिल्यावर
✍🏻(कवी.अमोलभाऊ शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर