स्वतःतच हरवलेला तो, भविष्याची निराधार स्वप्नं पाहणारा,
तिला संपूर्ण दुर्लक्षून, वाहातेय जी झऱ्यासारखी,
छोट्यातली छोटी गोष्ट त्याला भरभरून सांगणारी,
काय विचित्र जोडी आहे,
विमनस्क तो आणि भारावलेली ती..
तिला सहवासाची भारी ओढ, देखाव्याचा अगदी तिटकारा,
हा जणू रामदासांचा अवतार, चिंता करणारा विश्वाची.
पण विचारसरणी अगदी विरुद्ध, भौतिक सुखांना प्राधान्य देणारी.
काय विचित्र जोडी आहे,
विमनस्क तो आणि भारावलेली ती..
पार गुंतून गेलेली ती सर्वस्व अर्पून, हा भुंग्याप्रमाणे बहकणारा.
अगदी सहज अवगत झाल्यामुळे, तिच्या अस्तित्वाची जणू कदर नसणारा.
तिला न आवडणारी, तिच्यासकट सगळ्यालाच,
गृहीत धरण्याची ह्याची जुनी खोड.
काय विचित्र जोडी आहे,
विमनस्क ती आणि बहकलेला तो..
सहनशक्तीचा एक दिवस अंत झालाच, तिला दिसली भविष्यात होणारी चडफड,
नात्यात प्रेम राहिलं नसल्याची कित्येकदाची तिची तक्रार,
ह्या वेळा मात्र जाहिरच केलं तिने कायमचं दूर होण्याचं,
ती तिच्या सर्व निर्णयांप्रमाणेच ह्या निश्चयावर ही ठाम,
आणि तो पायाखालची जमीन सरकल्यागत बोबडी वळलेला,
खरंच काय विचित्र जोडी होती,
विमनस्क तो आणि करारी ती..
:- मोहित केळकर
kyaa baat..
khup chan mohitji..