हल्ली मला अस का होत,
तेच कळत नाही...!
मी नेहमी असा,
विचारात गुंतलेला असतो....!
का कुणास ठाऊक पण,
रात्रभर उगाचचं जागत राहतो....!
तो चंद्र अनं त्या तारका ही मग,
माझ्याकडे पाहत बसतात.....!
वेड मनं आहे हे माझं,
त्यांनाही आहे ठाऊक.....!
म्हणुनच रात्रभर ते,
माझ्या सोबतच राहतात.....!
अचानक लागते झोप,
मग सकाळच्या एक प्रहरी......!
तरीही मनं नसत था-यावर,
फिरत असत कुठेतरी सैरभैर.....!
निसर्गरम्य ठिकाणी दिसे,
पुसटशी आकृती एका परीची.....!
जाता जवळ तीला पाहण्यास,
बाळा उठ सकाळ झाली
अशी हाक येई मला आईची.....!
हाक येई मला आईची .......!
- रोहित मढवी......