जात
बाटवील कोणा अशी जात नाही
सोड माती कुणी कुठे जात नाही
स्वप्ने जरी खरी पडतात तुला ती
झोपतोस दिवसा पुरत रात नाही
चोरच म्हणे कसा करूनही चोरी
गुन्ह्यात जराही माझा हात नाही
जोडण्यास वाद्ये हट्ट असा नाही
विसरलो शब्द मी पुढे गात नाही
आश्वासने दिली अशी पुढाऱ्यांनी
शब्दांत कुठलीच खरी बात नाही
नको त्याच चर्चा उगाळतो साऱ्या
इतिहास जो खरा तोच ज्ञात नाही
© शिवाजी सांगळे 🎭
संपर्क:९५४५९७६५८९
खूपच छान शिवाजी सर .... प्रत्येक ओळीत खूप खोलवर अर्थ आहे .... नीट लक्ष देऊन वाचल्यावर तो अर्थ जाणवतो ......
मनस्वी आभार संजयजी... लोभ राहो🙏