अन माझी प्रितही न्यारी
तिच्या टपोऱ्या डोळ्यातं
माझ्या आठवणींच गावं,
अन तिच्या पापण्यांच्या किनाऱ्याला
जणू आसवांची नावं.....
संथ वाहणाऱ्या वाऱ्यालाही
हळूच स्पर्श तिच्या प्रेमाचा,
आलीच साथ कधी नकळत
पाणावती पापण्या सवे थेंब आसवांचा.....
दाटलाच भाव कधी हृदयात
तोडून बांध भावनांचा,
अन या ओसाड विरहाच्या दुनियेत
हा आक्रोश या मनाचा.....
आठवणींच्या वाटेवर शोधतो
तुझ्या पावलांची खून,
अन प्रेमाच्या ठेव्यातही
तिच्या विरहाचे ऊन.....
ओंजळीत नशिबाच्या आज
तिच्या प्रेमाची शिदोरी,
तिच्यासाठी प्रेमवेडा मी
अन माझी प्रितही न्यारी.....
-सोपान नांगरे
(एम. फार्मसी,द्वितीय वर्ष
B.V.C.P.K.)