होवू दे
डोळ्यात रात्र जागू दे
त्यात स्वप्ने तुझी येवू दे
उत्कटतेची मग मिठी
घट्ट कायम अशी होवू दे
वचनांचे दिल्या घेतल्या
तलम रेशमी बंध राहू दे
खेळ रसीला भावनांचा
बेहोशी न् गुलाबी होवू दे
गात्रा गात्रात गं झरता
मनांग सुगंधात न्हाऊ दे
© शिवाजी सांगळे 🎭
संपर्क:९५४५९७६५८९