लावणी - दिसे अंगा भरजरी
दिसे अंगा भरजरी, साडी तलम नऊवारी
नेसता नवथर नारी, पाहता उठे शिरशिरी ।।धृ।।
काया तीची कोवळी, जशी शेंग हो चवळी
सोन्या वानी पिवळी, जणू चपळ मासोळी
उजळं रूप ते भारी, अंगी चोळी जरतारी
माळून गजरा मोगरी, वाटे इंद्राची ती परी
दिसे अंगा भरजरी, साडी तलम नऊवारी
नेसता नवथर नारी, पाहता उठे शिरशिरी ।।१।।
प्याले नयन शराबी, गालावर रंग गुलाबी
आतुर ओठ जबाबी, पिऊन रस डाळींबी
गळा मोत्याची सरी, नी साज कोल्हापूरी
सजली नटून बावरी, करून शृंगार भारी
दिसे अंगा भरजरी, साडी तलम नऊवारी
नेसता नवथर नारी, पाहता उठे शिरशिरी ।।२।।
© शिवाजी सांगळे 🎭
संपर्क:९५४५९७६५८९
खूप सुंदर, अप्रतिम शृंगारिक मांडणी केली सर, जबरदस्त......
उस्फुर्त व प्रेरणादायक प्रतिक्रिये साठी प्रविणजी आपले मनापासून आभार, धन्यवाद.