कसे सांगु आज
माझ्या हृदयातल्या मुक्या भावनांना
तुझ्या अबोलामुळे
मीच जाळतो माझ्या भावनांना...
कसे थांबवु आज
डोळ्यातल्या आसवांना,
तुझ्या नकरामुळे
मीच वाहतोय माझ्या आसवांना...
कसे विसरू आज
तुझ्या सहवासांना,
तुझ्या प्रेमामुळे
मीच आठवतो तुझ्या सहवासांना...
कसे जगु आज
तुझ्याविना जगताना,
तुझ्या नसण्यामुळे
मीच श्वास रोखलोय जगताना...
बसवराज भिमणवरू
9049373372