स्पर्श
वाऱ्याचे असेच असते, हळूच येवून स्पर्शून जाणे,
नि:शब्द कळ्या फुलांना, स्मित देत खुलवून जाणे !
येणे जाणे जरी तयाचे, अस्तित्व तो ठेवून जातो,
स्मरण होता कधी कधी, रोमांचित करून जातो !
मौनाचा पहारा मौनात, बरेच काही बोलून जातो,
स्पर्श आणि मौन याच, भावनेने फुलून जातो !
खेळ असा लपाछपीचा, असाच रंगी रंगुन जातो,
सांज सकाळच्या उन्हात, अलगद मिसळून जातो !
सावरणे ते चांदणीला, स्वभाव गगनाचा तो,
हरवल्या तारकेला, क्षितिजा पल्याड शाधतो !
© शिवाजी सांगळे 🎭
संपर्क:९५४५९७६५८९
awesome mitra...mast
धन्यवाद मित्र
शिवाजी सर , स्पर्श हा काय किमया घडवतो, त्यात काय जादू आहे, काय विशेष आहे, हे आपण आपल्या "स्पर्श", या कवितेतून उत्तम रित्या शब्द-बद्ध केले आहे. यासाठी आपण वारा, कळ्या, मौन, ऊन, चांदणे, क्षितिज अशी अनेक विशेषणात्मक उदाहरणे वापरून त्यांचा कवितेत योग्य त्या जागी छान वापर केला आहे.
आपल्या मनाचा हळुवारपणा, नाजूकपणा या मौक्तिक शब्दांमधून दिसून येतो, हि छोटीशी भावना-त्मक कविता मनापासून आवडली.
स्पर्श घडवितो किमया सारी
स्पर्शात असते जादू भारी
कळ्यांचे फुल होता, उमलता
पवन उधळी सुरभी न्यारी.
-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-०४.०६.२०२१-शुक्रवार.