हे स्मितहास्य वदनी निरागस
येई शोभा गोड खळी गालावर
लोभस मुद्रा रविकिरणांची सोनेरी साक्ष
बोलके डोळे जणु देवत्वाचे तेज
आल्या छोट्या अप्सरा
इवल्याशा आमच्या अंगणात
तूम्ही आमचा मान
आमचा तूम्ही अभिमान
आर्या संस्कृति पुर्वा
हे रुप तुमचे किती अनुरुप
लक्ष्मी सरस्वती गौरी
भेटल्या भुतली आम्हा साक्षात
दिसे नम्रता,प्रीती
तुमच्या चालीबोलीत
कैलासाची जान्हवी
राजनंदीनी ऐैसी ऐट
अनंत तुझी कृपा
मंदारमाला पर्वताची रांग
नमन आमचे ओंकारा
लागे दत्तचरणाची आस
रत्नप्रभा संध्या छाया
अाहे सुवर्णासारखी युगंधरा
हे सगळे सत्यवचन
रमनी या सा-या उर्मिला
नवनीत नितीन चित्त
एैसा भगवंत निलेश
शामरंगी रंगे नीलकंठ
तोच देवाधी देव महेश
बंधुभावा जैसे राम-लक्ष्मण
तैसेची आहे भरत-शत्रुघ्न
श्रीकृष्ण हा लाडका
नंदा यशोमतीचा
असे भक्त त्याचा पार्थ
शांतनुच्या कुळातला
हरीओम पांडुरंगा
विठ्ठला मायबापा
सुरेंद्र वसु दे स्वर्गापरी एैसा
एैसे मागणे अखेरले तुज देवा.
©महेंद्र विठ्ठलराव गांगर्डे पाटील
९४२२९०९१४३
©sanjweli