Marathi Kavita : मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita => Prernadayi Kavita | Motivational Kavita => Topic started by: श्री. प्रकाश साळवी on July 20, 2018, 09:59:30 PM

Title: झुकतात माणसे !!
Post by: श्री. प्रकाश साळवी on July 20, 2018, 09:59:30 PM
झुकतात माणसे !!
-----------------------
पैश्यासाठी बघ कशी झुकतात माणसे
सुखाला खऱ्या कशी मुकतात माणसे
**
काळा किती गोरा किती कोणास ठावूक
लंपटही बघ कशी होतात माणसे
**
म्हणतात माय बाप देव माझे कसे
पैशातही बघ कशी विकतात माणसे
**
कसला देव आणि कुठला धर्म आहे
पैशालाच हल्ली पुजतात माणसे
**
मी माझा फ्लॅट आणि गाडी बघा हो
आयुष्यभर कर्जात कशी बुडतात माणसे
**
आयुष्यात येवून काय करावे बहादुरी
पै पैशासाठी बघा हो मरतात माणसे
**
हे माझे सगे सोयरे हवेत कशाला
करतात भेदभाव नात्यात माणसे
**
मी भारतीय, नागरिकत्व परदेशाचे!
माय बापा वृद्धाश्रमा ठेवतात माणसे
**
विसरले स्वत्व संस्कृती कशी ही
पैसा माणसा पैशातच जगतात माणसे
**
प्रकाश साळवी
बदलापुर - ठाणे
१९-०७-२०१८