Marathi Kavita : मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita => Prem Kavita => Topic started by: vebisarang1188 on September 03, 2018, 09:36:17 AM

Title: तूच माझी कविता
Post by: vebisarang1188 on September 03, 2018, 09:36:17 AM
तुझ्या वरची प्रीत दाखवण्याची कविता हे फक्त निमित्त आहे,
तू सोबत नसलीस कधी तरी तुझ्यातच गुंतलेलं माझं चित्त आहे...

वेगळेच बंध तुझे माझे नकळत जुळून आले,
अबोल प्रीत तुझी आणि मन माझे आसुसलेले

तू जवळ नसलीस कि कविता सुचते आणि तुझी आठवण रेंगाळत राहते मनात
तूच माझी कविता आणि तूच सारे काही माझ्या जीवनाच्या प्रत्येक पानात

............ वैभव सारंग