Marathi Kavita : मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita => Vatratika => Topic started by: vishal maske on September 24, 2018, 08:21:59 AM

Title: तडका - मतदान पध्दत
Post by: vishal maske on September 24, 2018, 08:21:59 AM
मतदान पध्दत

कुठलंही दाबा बटन तुम्ही
जाईल मत विशिष्ट पार्टीला
वेग-वेगळ्या ठिकाणी देखील
हल्ली हा विषय आहे चर्चिला

मतदारांसाठीही मनापासुन
आहे बॅलेट पेपर आकर्षक
कारण लोकशाही जगवण्या
मतदान असावेत पारदर्शक

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३