थेंबातुन कधी मऊसर मातीत रुजूनी ,कधी उतुंग सागरात एकजीव होऊनि
भूतात असेंन जरी सृष्टीचा अंग, तरी सर्व कणांवर बरसोनि
शब्द हि ओलाविले, म्हणून आज बोलतोय मी
मर्जीत येऊनि तरी मने भिजली नेहमी,प्रकांड रूपात धरणे गेली भरुनी
झाले स्वागत इवल्यांच्या बडबडगीतांनी
अथान्ग ..या वर्णनाने प्रफ़ुल्ल्ल मनही भाराविले, म्हणून आज बोलतोय मी
बरसतो,गरजतो ,गडगतोही ,कधी तुफानाच्या संगे थुईथुई नाचतो हि
कागदी बोटांच्या बुडाशी डबके बनुनी ,कधी पात्रपातळी गाठूनी खळखळतो हि
तरी ..का रे चा ब्र नाही, म्हणून आज बोलतोय मी
जीव अजीव नसूनही देवरूपी आकार दिलात तुम्ही,
बळीराजाच्या अश्रुंचे कारण जरी झालो तरी श्रावणसरींत सणांचे रंग उधळिले नेहमी
ह्या.. भाबड्या प्रेमात हरवलो, म्हणून आज बोलतोय मी
ठे प्रलयरूपात जीवे मारलेच मी, कुठे रुसव्याने सुकले कित्येक गण हि
विजस्पर्शाने कित्येकांची राखरांगोळीहि झाली
अश्या बदलत्या रूपात सावरून घेतले मला
परतफेड नाही ह्याची जाणीव होते मला, म्हणून आज बोलतोय मी
ओसाडलेल्या मातीत लटकलेले देहांत पाहता मन पिळवटून निघते आज हि
माझ्या येण्याच्या प्रतीक्षेत डुबले नयन आज हि
क्षमाच मागता येईल एवढीच आस धरून बोलतोय मी ..आज बोलतोय मी
लेखन = कु. नीलम दळवी
neelam9dalvi@gmail.com