॥ तु सागर,मी घागर ॥
(--- सौ.अलका परांजपे,जबलपुर.)
कुठे सागराची अथांगता,कुठे घागरीची चंचलता।
नाहीं तुलना कुठेच,आहे सागराची फक्त विशालता॥
करते म्हणून च तुझी तुलना,त्या सागराच्या अथांग तेशी॥
तुझी आहे प्रगल्भ बुद्धि,म्हणून च तुला,जोडते सागराशी॥
मला नाहीं मिळाल्या ,तुझ्या सारख्या बुद्धि च्या राशि।
केवळ घागरी इतकी च बुद्धि,मिळाली मला पुरेशी॥
म्हणून च स्वतः ला समजते मी धन्य,तु सागर मी घागर॥
ह्या साधारण घागरीला तु ,सामावुन घेतले आहेस खरोखर॥
माझे भाग्य थोर,म्हणून मिळाला मला तुझा संग।
तुझ्या सहवासाने माझे उजळले ,भाग्य नी जीवन -रंग॥
होते जेव्हां एकटी,फक्त घागर रूपी साधारण रूप।
तुझ्यात मिसळुन मला समजले,माझे किती क्षुद्र स्वरूप॥
उगीचच होत्या माझ्या मनी,स्वतः विषयीच्या गैर भावना।
तुझ्यात समाविष्ट होऊन मात्र,विरघळल्या माझ्या दुर्वासना॥
उगाच खळखळाट करून,दिसते माझे अज्ञान मात्र।
नाहीं माझी बुद्धि ची प्रगल्भता,तुझे आहे थोर चरित्र॥
तुझ्या पुढे आहे मी,सदा,जसे कमळा खालील चिखल।
चिखलाने किती ही तोंड वर केले,तरीही राहील तो खोल॥
किती ही केला प्रयत्न मी,तुझ्या शी होण्यास एकरूप।
तरी नाहीं होऊ शकत,तुझ्या रूपाशी अनुरूप॥
म्हणून दे मला फक्त,तुझ्या चरणाच्या काठाशी स्थान।
न्याहळत राहील तुझी अथांगता,तुला करीन समर्पित जीवन दान॥
नाहीं होऊ शकत मी,कधी च तुझ्या सारखा अथांग सागर।
चरण स्पर्शाने च पुलकित होईन,घेऊन चरणामृत जीवन भर॥
XxxxxxxX
म्हणून दे मला फक्त,तुझ्या चरणाच्या काठाशी स्थान।
न्याहळत राहील तुझी अथांगता,तुला करीन समर्पित जीवन दान॥
अप्रतिम