जो अश्रूंना लपवतो
पण मुलांस हसवतो
फाटके कपडे घालतो
पण मुलांस सांभाळतो
कधी हाऊस केली नाही स्वतःची
पण मुलांस सर्व काही देई
कष्ट करुनी घाम गाळतो
मुलांस पूर्ण जीवन देतो
कधी नाही केली तक्रार
स्वतः सहन केले त्रास
जन्मभर जपले ऋण छान
जीवास जीव देई माझा बाप
स्वतःचे मन केले कठोर
कधी पडला नाही प्रेमाचा विसर
असा हा बाप..... माझा बाप...... माझा बाप....
तेजश्री कांबळे