वळणावर अखेरच्या,
वळून मागे पहाताना,
एक प्रतिमा दिसते,
मजकडे पाहताना ,
डोळ्यात भाव दाटले,
परी शब्द मुक जाहले ,
भाषा नयनांची ऊमगली ,
परी वास्तव आड आले ,
बंधने संस्कारांची ,
सभोवती घट्ट झाली ,
आस ही मनातली ,
मनातच लुप्त झाली,
जाणीव कर्तव्याची ,
नित सामोरी आली,
भावना मनातली ,
आसवात चींब झाली,
एकांती आक्रोशीता मन,
प्रतीमा सामोरी येते ,
पसरल्या बाहूत अलगत ,
बिलगुनी विसाऊन जाते ,
अशोक मु. रोकडे.
मुंबई.