Marathi Kavita : मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita => Vidamban Kavita => Topic started by: siddheshwar vilas patankar on January 15, 2019, 07:31:05 PM

Title: बडव्यांची दुनिया
Post by: siddheshwar vilas patankar on January 15, 2019, 07:31:05 PM
प्रस्तावना

जंगलावर राज्य करायचं असेल

तर खबरीलाल पोपट पाळून चालत नाही

त्यासाठी सिंव्ह पाळावा लागतो

हा सिंव्ह आपल्यासमोर उभा आहे

फक्त आपल्या किमतीचा भाव जुळावा लागतो

-----------कविता -------

धूर दिसे , काहीही नसे

पोपट करी जो त्रागा

शिकाऱ्यास तो असे भासवे

जणू तोच जीवनधागा

जंगल मंगल पोपटामुळे

पोपट किती रे चपळ

हा नसता तर अवघड असते

पेलले नसते जंगल

बित्तम्बातमी अशी आणतो

जंगलाची जणू नस जाणतो

पोपट पोपट करी शिकारी

काहीच सुचे ना त्याला

पोपट मारी अशी फुशारी

जणू हाच एकमेव जंगलाला

सिंव्ह बिचारा सुखी आपला

मालूम नसे हे त्याला

शिकार्यासी तो देव मानुनी

रोज पूजी तयाला

दिवसामागून दिवस चालले

गोडवे गाई पोपटाचे

हा असताना काय करू मी

घेऊन हात शस्त्रांचे

बिनशस्त्राचा डाव खेळला

वाघ बघुनी एकला

पोपट काही अस्सा पळाला

त्याचा मागमूस ना दिसला

संकट होते उभे ठाकले

अंगात भरले कापरे

धागा केव्हाच उडुनी गेला

उडतील अब्रूची लक्तरे

पोपट पोपट म्हणुनी तो थकला

कंठही त्याचा सुकला

गलितगात्र तो असा जाहला

तेव्हा सिंव्ह समोर दिसला

आर्जवे विनवी सिंव्हासी

सांगे करावया बचाव

शिरसावंद्य मानुनी त्यास

टाकले डावावरती डाव

शिकाऱ्यास मग कळून चुकले

फुका पोपटाचे पुढे नाव

अजस्त्र ताकद , अभेद्य छाती

वाघास चारिली यथेच्छ माती



  8) 8) 8) (((  सिद्धेश्वर विलास पाटणकर )))  8) 8) 8)