*शीर्षक.खोटे प्रेम*
दिलेले प्रेम तुला जाहले जरी चूक आज
खोटे प्रेम देणारी जाहली तू बेडूक आज
कोणास ठाऊक तू
किती रंग बदललेस
वासनेच्या पलीकडे
तू मुखवटे चढवलेस
पैसा अन लूट हीच सारी तुझी भूक आज
खोटे प्रेम देणारी जाहली तू बेडूक आज
रोज नवे बहाणे करून
आशा पल्लवीत कराचीस
मृदू हृदयाचा मी म्हणून
माझी नाजूक नस धरायचीस
तुजवर विश्वास ठेऊन जाहलो मूक आज
खोटे प्रेम देणारी जाहली तू बेडूक आज
वार जरी व्हायचे
खोलवर हृदयाला
प्रेम आले नाही कधी
तुझ्या अंतरात उदयाला
तुझ्यामुळे घाव सारे जाहले नाजूक आज
खोटे प्रेम देणारी जाहली तू बेडूक आज
मागणं पूर्ण होत होतं
वेडा जेव्हा संबोधलो
साखळी गुंडाळत गेली
तेव्हा फास घेऊन अडकलो
प्रेमाचा डाव तुझा भासला बंदूक आज
खोटे प्रेम देणारी जाहली तू बेडूक आज
संपवले आयुष्य तू
राग मनात धरणार नाही
मिळेल तुला ही कधी तो
जो तुला कधी जपणार नाही
मग येईल आठवण होशील भावूक आज
खोटे प्रेम देणारी जाहली तू बेडूक आज
मिळालेले छत तुला
कधी जपता आलेच नाही
दिलास जरी इशारा तू
याचे उपकार झालेच नाही
जान तुला जाहली प्रेमाची ठावूक आज
खोटे प्रेम देणारी जाहली तू बेडूक आज
✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर