लाख तारका नभी चमकती ,
परि अंधार दाटला आहे ,
चहूदिशांना नयन शोधती ,
चंद्र माझा हरवला आहे ,
वादळ वारा तुफान भयंकर,
लढा अस्तीत्वाचा सुरू आहे ,
तेजोमय ज्योत संविधानाची ,
दिपस्तंभावर तेवत आहे,
चहूदिशांना नयन शोधती ,
चंद्र माझा हरवला आहे ,
जात पात धर्म द्वेषाचा,
वनवा पसरला आहे,
प्रेमभाव समानतेचा ,
झरा शुष्क झाला आहे,
चहूदिशांना नयन शोधती ,
चंद्र माझा हरवला आहे ,
निबिड अंधार अरण्य भयंकर,
वाटचाल प्रगतीची सुरू आहे,
मशाल हाती "जयभीम" नावाची ,
वन काटेरी तुडवित आहे,
चहूदिशांना नयन शोधती ,
चंद्र माझा हरवला आहे ,
"बाबांनी" जो दाविला मार्ग,
तो एकच सुखमय आहे,
"बुध्दम शरनम गच्छामी ",
मंत्र शांतीचा जीवनी आहे,
चहूदिशांना नयन शोधती ,
चंद्र माझा हरवला आहे ,
अशोक मु. रोकडे.
मुंबई.