Marathi Kavita : मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita => Virah Kavita | विरह कविता => Topic started by: कवी अमोलभाऊ शिंदे पाटील on March 01, 2019, 11:58:00 AM

Title: असं सारं काही
Post by: कवी अमोलभाऊ शिंदे पाटील on March 01, 2019, 11:58:00 AM
*शीर्षक.असं सारं काही*

असं सारं काही विसरून
जातांना तुझाच राहतो
अगदी शेवटच्या श्वासा पर्यंत ..........

आकाशाची मोजणी करतांना
जसा वेळ लागतो ना अगदी तसाच
मला तुझ्या तिरस्काराची मोजणी करतांना लागतो
जशी विना तुपाची वात
अन अंधारात तू विचारलेली जात

असं सार काही विसरून
जातांना तुझाच राहतो
अगदी शेवटच्या श्वासा पर्यंत  .....

एक एक थेंब पुन्हा तुझं नावं घेतो
सप्तसुरांची आरास सुरू होते
पुन्हा विरह गीताची गुणगुणू सुरू होते
अंतर पुन्हा वाढवत जाणाऱ्या मरणाच्या
झळा चहूबाजूनी चटके देऊ लागतात

असं सारं काही विसरून
जातांना तुझाच राहतो
अगदी शेवटच्या श्वासा पर्यंत .....

असंख्य काजवे टीमटीमु लागतात
नजर खाली वर होते
आभाळ रिंगण घालू लागतं
मिठी मारू लागतं पुन्हा
पावसाची रिमझिम सुरू होते
गच्च चिकटून बसलेला मी
असा अलगद मग निसटून पडतो
सहाजिकच प्रेम भंग झाल्यागत सारं काही विसरू लागतं

असं सारं काही विसरून
जातांना तुझाच राहतो
अगदी शेवटच्या श्वासा पर्यंत ....

तुझ्या आठवणींचा एक धडा समोर येतो
त्यात तुझ्याव्याख्या असतात नकळणाऱ्या
विश्वासाचं डोंगर दुरून पाहणाऱ्या
अन चिरचिर चिरलं जातं काळीज
मरण घेऊन येतात त्या अन राख
तुझी वाट पाहते शेवटी
नदीत ओघळून जातांना

असं सारं काही विसरून
जातांना तुझाच राहतो
अगदी शेवटच्या श्वासा पर्यंत .....

एक तिढा सुटत नाही
तू माझ्या भावनांशी खेळल्याचा
का अन कसा घात केलास तू
सरळ साध्या जगणाऱ्या एक अवलियाचा
निष्पाप काळजावर ठप्पा मारून
तू या जगात एकटं करून गेलीस
कोणाच्या आधाराशिवाय जगण्यासाठी

असं सारं काही विसरून
जातांना तुझाच राहतो
अगदी शेवटच्या श्वास पर्यंत........

✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर