प्रस्तुत कविता ही जगदीश खेबुडकर सरांच्या *ऐरणीच्या देवा तुला* या गाण्यावर आधारित निवडणुकीवर केलेले *विडंबन काव्य* आहे. या कवितेसाठी मी सुरुवातीला मूळ कवींची माफी मागतो.
*निवडणुकीच्या देवा तुला*
निवडणुकीच्या देवा तुला बाटली बाटली वाहू दे,
निवडणुकीपूरती माया तुझी आम्हावरी राहू दे।।
बाटल्या वाटू इंग्रजीतल्या,
नोटा वाटू बंडलातल्या,
निवडून मात्र देवा आता ,बहुमतात येऊ दे,
निवडणुकीपूरती माया तुझी आम्हावरी राहू दे।।
सोय होईल बारबालांची,
गांज्या मावा तंबाखूची,
किरपा तुझी निवडणुकीपूरती आम्हासंग असू दे,
निवडणुकीपूरती माया तुझी आम्हावरी राहू दे।।
बाटल्या नोटा पडल्या कमी तरी मटणाची पार्टी घे,
काहीही दिलं कुणी तरी मत मात्र मलाच दे,
मी जर निवडून आलो तर परत एकदा पार्टी घे,
निवडणुकीपूरती माया तुझी आम्हावरी राहू दे।।
निवडणुकीच्या देवा तुला बाटली- बाटली वाहू दे,
निवडणुकीपूरती माया तुझी आम्हावरी राहू दे।।
--महेश थिटे,
अहमदनगर
9156989636