*शीर्षक.आठवणीतला पत्ता*
नको विचार करुस
काव्य माझे स्मरतांना
अडगळीतला होईल
पुस्तक धुळीत लोळतांना
आठवणीतला पत्ता
तू जपला नसतांना
समोरून गेलो असाही
कायमचा दूर असतांना
बोलावण माथी घेतलं
प्रेमात विरह सोसतांना
श्वास माझा वाट पाहिलं
तू फुले शेवटी वाहतांना
विरोध तुझा झाला
दुःख सारं सावरतांना
अन पाठलाग केलास तू
मयत माझी आवरतांना
हृदय तू जाळलं होतं
दोन थेंब ते ओघळतांना
हळवी झालीस का तू
राख माझी घोळतांना
✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर