*शीर्षक.क्षणिक सुख*
कोणाचे नुकसान कोण भरेल देवा
क्षणिक सुख आहे बघ किती पुरेल देवा
का वाईट सवय आहे कशी मनाला या
घटकेचा धनी ही एक दिवस मरेल देवा
काय होणार आहे माहीत आहे सारं मला
या कारणाने दुःखात रोज मी झुरेल देवा
बोललो मी सत्य पचले नाही कोणास
तरी खोटारडा मी जगात या ठरेल देवा
प्रेमातले नुकसान आता मिळणार नाही
नागमोडी वाट ती आता बदल करेल देवा
बरबाद जिंदगीची कविता लिहावी का
बरबाद जिंदगीची रात्र ही सरेल देवा
पाहिले प्रेमाचे जालीम विष पिऊन मी
फिरून पाहता मागे बदनामीचं उरेल देवा
✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर