Marathi Kavita : मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita => Virah Kavita | विरह कविता => Topic started by: कवी अमोलभाऊ शिंदे पाटील on July 21, 2019, 04:57:04 PM

Title: सांगतो
Post by: कवी अमोलभाऊ शिंदे पाटील on July 21, 2019, 04:57:04 PM
*शीर्षक.सांगतो*

तू का कशाला जाळायचे सांगतो
उगाच का दुःख पाळायचे सांगतो

पुस्तकी लिपी आहे रे ती आता
कळली तरी उगाच टाळायचे सांगतो

ती असली जरी समोर माझ्या रोज
मनी नसता तिच्यावर भाळायचे सांगतो

सवय झाली आहे आता काळजाला
विरहात अश्रू का ढाळायचे सांगतो

मित्रा तूच समजून घेतलं आहे मला
दोस्तीला आपल्या का साळायचे सांगतो

✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर