मैत्री साजरी करायला
एक दिवस पुरेसा नाही..
संपूर्ण आयुष्य सरले तरी
कित्येकांना मैत्री कळालीच नाही..।।
मैत्री म्हणजे ,
निरंतर प्रेम तर कधी क्षणिक राग आहे
निरपेक्ष मन आणि जिवाभावाची साथ आहे..।।
मैत्री म्हणजे ,
कधी आपुलकी तर कधी दरारा आहे
कधी सहवास तर कधी जिव्हाळा आहे..।।
ज्यांना कळली नाही मैत्री
त्यांचं जीवनच व्यर्थ आहे..
अन ज्यांना समजली मैत्री..
त्यांच्यासाठी धर्तीवरच स्वर्ग आहे..।।
-- तेजस्वी मोहिते
छान