Marathi Kavita : मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita => Bhakti Kavita => Topic started by: शिवाजी सांगळे on August 23, 2019, 08:19:39 PM

Title: साद बासरी
Post by: शिवाजी सांगळे on August 23, 2019, 08:19:39 PM
साद बासरी

साद घाली तुझी बासरी
पसरवी आनंद चराचरी
मधुर स्वर अवीट असा
जातोय पाझरूनी अंतरी

वेडावते राधा अन् रानात
शहारे कालिंदी जळावरी
चौफेर भुलवी मोह वेडा
फुलं वेली, गाई गुरे सारी

वेणूनाद म्हणती तयाला
कुणी म्हणती साद पावरी
घुमत राहतोय युगेनूयुगे
ध्यास कान्हाचा नित्य उरी

© शिवाजी सांगळे 🦋
 संपर्क:९५४५९७६५८९