घुटमळलेलं मन हळूच सांगते
की हे जगणे झाले तुझ्यासाठी...
सोबत असून ही एवढी दूर
नेहमी अर्धीच राहिली भेट तुझ्यासाठी...
तुटलेले तारे आणि देव्हाऱ्यात
जुळल्या प्रार्थना फक्त तुझ्यासाठी...
नको हा खऱ्या-खोट्याचा आधार
फक्त तुझ्यासाठी...
सगळं सहन करील तुझ्या सुखासाठी,
मरुनी परत जन्म घेईल तुझ्यासाठी....
©️ वैभव नारायणराव वैद्य.
मुक्काम पोस्ट सिलिकॉन व्याली.