त्यांनी नाटक रचलंय,
आम्हा भाबड्याना फसवायचं,
आमचा वाघ हरवलाय, सेना उरलीये
आता फक्त कोल्ह्या आणि लांडग्यांची,
कमळाच्या गर्भात घुसून बसलाय डोमकावळा,
यथेच्च सुख भोगायला,
इंग्रजांनी सुरु केली होती काँग्रेस ची शाळा,
सेफ्टी वाल्व म्हणून,
अखेर ते गेले कोहिनुर घेऊन,
आम्ही जकडलो धर्माच्या बेड्यांमध्ये,
आम्ही भाबडे जळत राहिलो स्वातंत्र्या साठी,
नावाला आहे लोकशाही,आम्ही अजूनही पारतंत्र्यातच ,
आता आलेत काळे इंग्रज, सेफ्टी वाल्व झाली सेनेची,
काळ्या इंग्रजांनी म्हणे निवडणुकीच नाटक रचलंय परत,
आम्हा भाबड्याना फसविण्यासाठी ......
© तेजस्विता खिडके