भीक मागत फिरलो दारोदारी
अन्ना साठी वणवण फिरत होतो
जित्यापणी नाही रे खाऊ घातले
मेल्यावर आता घालतो दहावे तेरावे
मौत माझी झाली खरी
पण मेलो मी कधीचाच होतो
तेंव्हा तुला मी दिसलो नव्हतो
आता करणार तु मौत माती माझी
खोट्या समाजाला करशील आता खोटा देखावा
रचशील सरण अन देशील अग्नी डाग मला
अखेरचा निरोप माझा घेशील आज खरा
मारशील प्रदक्षिणा, फोडशील घडा
करशील पिंड दान, मी कावळा होऊन येईल ?
का ? कशासाठी ?
सडुन सडुन गेले शरीर माझे
तरीही ठेविले तु तसेच , तुझ्या स्वार्था साठी
मौती चा ही दिवस माझा तुच ठरवलास
तुझ्या फायद्यासाठी
जगास दाखव किती ही दिखावा
मनापासून कुठे धावशील
मी भुतकाळ जाहलो आज
तु ही नाहि सदा सर्वदा
जीत्यापनी मी स्वर्ग पाहिला
अन पचलो मुता कुतात तेंव्हा नर्क ही पाहिला
सोडुनिया सर्वस्वा आता चालिलो मी माझ्या गावा
करितो नमन हा माझा अखेरचा राम राम घ्यावा ..
© Tejaswita Khidake