*शीर्षक.मी सहजचं*
वाढलेले केस पाहून
ती नेहमी बोलायची
आरं कधी सुधरशील
खरं माणूसपण कधी जपशील
पण मी आपला तसाच रहायचो
अन मित्रांन मधीचं रमायचो
कधी उनाड धिंगाणा मस्तीत गुंग व्हायचो
मी सहजचं सारं काही दुर्लक्ष करायचो
आतल्या आत तिच्या प्रेमासाठी झुरायचो
रस्त्यातून चालतांना
मैत्रिणी संग बोलतांना
ती नजर चुकवून
माझ्याकडे बघायची
नजरा नजर होतांना
माझ्यात एकरूप व्हायची
कधीच कळलं नाही मला
ती खरंच लाईन द्यायची
मी आपल नेहमी टुकार वागायचो
तिच्या कडं डोळे वटारून बघायचो
मी सहजचं सारं काही दुर्लक्ष करायचो
आतल्या आत तिच्या प्रेमासाठी झुरायचो
गम्मत तर तेव्हा व्हायची
पेपरला माझ्याकडे कॉपी असायची
ती मात्र अभ्यास करून यायची
माझी कॉपी पकडली की
ती तिचा पेपर बिनधास्त द्यायची
मी नापास न व्हावं म्हणून
ती तिचं स्वप्नं माझ्या हाती द्यायची
मी सहजचं सारं काही दुर्लक्ष करायचो
आतल्या आत तिच्या प्रेमासाठी झुरायचो
मग एक दिवस उजाडलाच
मी सारा किस्सा उलगडलाच
तिला सारं बोलून बसलो
मनातले राज खोलून बसलो
ती फक्त हसून गेली
मला मात्र फसून गेली
तिचा रिचार्ज माझ्या मोबाईल मधूम मारायचो
ती दिसली नाही का रड रड रडायचो
वहित मात्र तिच्या विषयी खरडायचो
मी सहजचं सारं काही दुर्लक्ष करायचो
आतल्या आत तिच्या प्रेमासाठी झुरायचो
तिचं दुसऱ्याशी जमलं म्हणून
एक दिवस ती मात्र दिसली नाही
मला पाहून पुन्हा हसली नाही
तिच्या विषयीचा अंदाज मात्र हुकला
तेव्हा काळजाचा ठोका चुकला
ती मात्र निशब्द झाली
मी मात्र लिहीत गेलो
प्रेमाच्या दुनियेत विरह कवी झालो
कविता लिहीताना तिला आठवायचो
प्रत्येक ओळीत तिला भरायचो
मी सहजचं सारं काही दुर्लक्ष करायचो
आतल्या आत तिच्या प्रेमासाठी झुरायचो
✍🏻(कविराज.अमोल दशरथ शिंदे).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर