छंद - कविता
मन रमविणे हा छंद आहे
प्रत्येकाचा वेगळा
कोणा आवडे खेळ अन्
कोणा रमविते चित्रकला
मोद मिळतो कोणताही छंद जोपासल्यावरी
छंद वेगवेगळे देती आनंदही नानापरी
कोणास आवडे नृत्य-गाणे
तर कोणास पोहोणे आवडे
कोणा आवडती चित्रपट अन्
कोणास नाटक आवडे
कोणास पाळीव पक्षी तर्
कोणास प्राणी आवडे
गिर्यारोहण व पर्यटनही ही गोड छंद
ज्यासी भ्रमंती आवडे
वेगळा व्यायाम नको, छंद आहे तो पुरे
वाचनाचा छंद जोपासतो जो एकटा
मौज वाटे वाचताना एका मागे कथा
मन चिरतरुण ठेवी लेखनाचा छंद हा
कल्पना नाना सुचती लेखकांना पहा
जोडावे अनेक मित्र हा ही छंद आहे वेगळा
आनंद त्याचा फार गोड अन् छंद आहे आगळा
छंद हा असावाच कोणता ना कोणता तरी
आनंदी हे आयुष्य होते छंद जोपासल्या वरी
स्वच्छंदी असते आयुष्य अन्,
जग ही असते एकट्याचे,
आपल्या मर्जीचे असतो राजे आपण घरी
मोद मिळतो कोणताही छंद जोपासल्यावरी
- शिवानी वकील