बघ वळुन
जरा बघ मागे वळुन एकदा
कथा यश अन् अपयशाच्या
दाखवितो भुतकाळ कैकदा
शिकायचे त्यामधून घडायचे
मार्ग भविष्याचे करीत सुकर
जगायचे आयुष्य हे अनेकदा
राहावे सदा सुहास्य सन्मार्गी
प्रामाणिकतेची कास धरूनी
पाळावा समाजातला कायदा
मनी उरे मग कशी विवंचना
चालून येई तुज पायाजवळी
आरोग्य सौख्य ऐश्वर्य संपदा
© शिवाजी सांगळे 🦋
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९